Wednesday , March 4 2026
Breaking News

येळ्ळूर येथील सिद्धेश्वर गल्लीमध्ये पेव्हर्स बसविण्याच्या कामाला सुरुवात

Spread the love

 

बेळगाव : येळ्ळूर येथील सिद्धेश्वर गल्लीमध्ये पेव्हर्स बसविण्याच्या कामाला मंगळवार (ता. 24) रोजी सकाळी सुरुवात करण्यात आली. ग्रामपंचायत सदस्य विलास बेडरे, ग्रामपंचायत सदस्या राजकुंवर पावले, सदस्य राजू डोन्यान्नावर यांच्या हस्ते पूजन करून पेव्हर्स बसविण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या फंडातून या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. गल्लीतील नागरिकांनी आमदार अभय पाटील यांना भेटून गल्लीमध्ये पेव्हर्स बसवून देण्यासाठी निवेदन दिले होते. या निवेदनाची दखल घेत, लागलीच सिद्धेश्वर गल्लीमध्ये पेव्हर्स बसविण्याच्या कामाला आज सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रा. सी. एम. गोरल यांनी येळ्ळूर गावामध्ये आमदार अभय पाटील यांच्या सहकार्यातून सुरू असलेल्या व पूर्ण झालेल्या कामांचा आढावा घेतला. यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य यल्लाप्पा गोरल, शिवाजी पाटील, सामाजिक कार्यकर्ते डॉ. तानाजी पावले, सुरज गोरल, यल्लुप्पा पाटील, प्रा. सी. एम. गोरल, चांगाप्पा मजूकर, गंगाराम कणबरकर, सहदेव काटकर, आकाश कुकडोळकर, आदी यावेळी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *