बेळगाव : गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी पाटील गल्ली शनी मंदिर येथे दुर्घटनेत विजय राजगोळकर ही व्यक्ती जखमी झाली होती. त्यांना सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलं होतं. परंतु तिथे शस्त्रक्रिया करण्यासाठी काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे विजय हॉस्पिटल येथे त्यांना दाखल करण्यात आलं. त्यांच्या उपचारासाठी मध्यवर्ती गणेश उत्सव महामंडळाकडे विविध मंडळाने मदत जमा केली होती त्या सर्व रक्कम एकत्र करून 50 हजार रोख रक्कम आज दिनांक 25 सप्टेंबर 2024 रोजी विजय हॉस्पिटलला मध्यवर्ती महामंडळाचे अध्यक्ष रमाकांत दादा कोंडुस्कर व कार्यकारी सचिव प्राचार्य आनंद आपटेकर यांनी भेट देऊन त्यांच्या नातेवाईकांच्या हाती स्वाधीन केले.
मध्यवर्ती गणेश उत्सव महामंडळ अध्यक्ष रमाकांतदादा कोंडुस्कर यांच्याकडून 5000 रुपये, बेळगावचा राजा गणेश उत्सव मंडळ चव्हाट गल्ली यांच्याकडून 11000 रुपये, सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ तहसीलदार गल्ली 5000 रुपये, जत्तीमठ देवस्थान कडून 10000 रुपये, गणेश उत्सव मंडळ शाहूनगर 10000 रुपये, गणेश उत्सव मंडळ खादरवाडी 5,652, अभिजीत भातकांडे, पाटील गल्ली बेळगाव 5000 एकूण 51652 रुपये जमा झाली होती. त्यातली 50 हजार रोख विजय राजगोळकर यांना दिले व अजून काही मंडळांनी देणगी जाहीर केलेली आहे. त्या सर्व एकत्र करून चव्हाण पाटील हे मृत पावलेले व्यक्तीच्या नातेवाईकांकडे काही दिवसात सर्व रोख रकमेची मदत गोळा करून देण्यात येणार आहे व अजून जवळपास शेकडो मंडळ कार्यरत आहेत त्या सर्व मंडळांना पुन्हा एकदा अध्यक्षांनी आवाहन केले आहे की, त्यांनी फुल ना फुलाची पाकळी मध्यवर्ती गणेश उत्सव महामंडळाकडे आपले मदतीची रक्कम पोच करावी अशी पुन्हा एकदा विनंती करत आहे.