उचगाव : गुरु शिष्याचे नाते हे प्राचीन काळापासून चालत आले आहे. प्रगत तंत्रज्ञानात गुरूंचा आदर व्यक्त करण्यासाठी केलेला हा सोहळा पाहून आम्ही धन्य झालो. शिष्यांच्या जीवनातील अंधकाराचा नाश करून राष्ट्र व धर्म यांच्या रक्षणासाठी गुरु शिष्य नाते हेच सर्वश्रेष्ठ आहे अशा प्रकारचे प्रतिपादन स्वामी विवेकानंद हायस्कूलच्या शैक्षणिक वर्ष 130 या दहावीच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या गुरुवंदन व विद्यार्थ्याचा स्नेहमेळावा याप्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमात उचगांव हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक पी. के. तरळे यांनी अध्यक्षपदावरून केले. हा कार्यक्रम सुळगा येथील निसर्गरम्य परिसरातील जत्रा हॉटेलच्या सभामंडपात 73व्या प्रजासत्ताक दिनी कार्यक्रमात संपन्न झाला. प्रथम शिक्षिका चंदू तेरसे, बेबी तुपारे, कांचन जाधव यांच्या ईशस्तवन गायनाने प्रारंभ झाला. यावेळी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनीनी गुरूंना मानवंदना करून गुरुजनांच्यावर पुष्पवृष्टी करून स्वागत केले. त्यानंतर कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. यावेळी माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात पार पडला.
Check Also
युवा आघाडीतर्फे उद्या सैन्यात भरती झालेल्या जवांनाचा सत्कार
Spread the love बेळगाव : बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा आघाडीच्या वतीने उद्या बुधवार दिनांक …