Thursday , November 21 2024
Breaking News

मराठी विद्यानिकेतनच्या मुलींच्या खो-खो संघाला जिल्हापातळीवर विजेतेपद

Spread the love

 

बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खाते आयोजित जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धा आंबेवाडी बेळगाव येथे 1 ऑक्टोबर रोजी संपन्न झाल्या. या स्पर्धेत माध्यमिक विभागाच्या मुलींच्या संघाचा सहभाग होता.
पहिल्या फेरीत सौंदत्ती विरुद्ध सामन्यात एकतर्फी विजय मिळवला त्यानंतर उपांत्य फेरीत खानापूर विरुद्ध 10-6 अशा गुणांनी विजय पटकावत अंतिम सामन्यात प्रवेश मिळविला. अंतिम सामना बेळगाव शहर विरुद्ध बेळगाव ग्रामीण यांच्यामध्ये खूप अटीतटीचा झाला. यामध्ये बेळगाव शहर म्हणजेच मराठी विद्यानिकेतन शाळेच्या संघाने 10-8 गुणांनी बेळगाव ग्रामीण विरुद्ध विजेतेपद पटकाविले.
मुलींच्या खो – खो संघाची विभागीय स्तरावर होणाऱ्या खो-खो स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. या संघाला श्रीधर बेन्नाळकर यांचे प्रशिक्षण तर क्रीडा शिक्षक महेश हागिदले दत्ता पाटील व पूजा संताजी यांचे मार्गदर्शन तसेच शाळेचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर, गजानन सावंत, शिक्षण संयोजक निला आपटे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्रोत्साहन मिळत आहे.

About Belgaum Varta

Check Also

मराठी विद्यानिकेतनच्या खेळाडूंचे वेटलिफ्टिंग स्पर्धेत घवघवीत यश

Spread the love  बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खाते आयोजित मंगळूर या ठिकाणी संपन्न झालेल्या राज्यस्तरीय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *