बेळगाव : वडगाव येथील खरोशी हॉल चावडी गल्ली येथे रविवार दिनांक 6 फेब्रुवारी रोजी सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकदिवसीय ओशो ध्यानधारणा शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शीतल यांनी दिली आहे. या शिबिरात मैसूरच्या कृपा मां शिबिरार्थींना मार्गदर्शन करणार आहेत.
रविवारी आयोजित करण्यात आलेल्या शिबिरास संदर्भात अधिक माहिती देताना शितल म्हणाल्या, भगवान ओशोंची आठ हजार प्रवचने आहेत. त्यांनी उपनिषद, महावीर वाणी, गौतम बुद्ध, कृष्णदर्शन, अष्टावक्र महागीता, शिवसूत्र, मिरा, नारदसुत्र, गोरख व पतंजली योगसूत्र यावर प्रवचने दिली आहेत.
ओशोनी संत कबीर, गुरुनानक, लाओत्से, जिजस व महमंद पैंगबर यांचे तत्वज्ञान व आध्यात्म बद्दल बोलले आहेत म्हणजे सर्वामध्ये प्रेम वसले पाहिजे अशी
असहिविष्णूता ही शिकवण ओशोनी दिली.
आजच्या रोजच्या धकाधकीच्या जीवनातील स्वतःचा ताण तणाव कमी करण्यासाठी ध्यान साधना महत्वाची आहे. ओशोनी 115 ध्यानविधी साधकांसाठी दिले आहेत. ध्यान म्हणजे एकरूप होणे. त्यासाठी आपण श्वासापासून सुरुवात करतो. ध्यानाची पद्धत अगदी सोपी आहे. ध्यान करून आपल्याला भरपूर आध्यात्मिक ऊर्जा व आध्यात्मिक विवेकज्ञान मिळते. ध्यान केल्याने सुख, दुःखाच्या पलीकडील अनुभूवती होते. ध्यानाने कमवलेली ऊर्जा चौविस तास टिकविण्याचे काम करते. जीवनाला आनंद देते. स्थिर होण्याची कला शिकवते. आपलं स्वास्थ उत्तम होण्यासाठी तसेच मनशांती ही लाभते आणि जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. यासाठी ध्यान महत्त्वाचे आहे. ध्यानाचे महत्त्व जाणून इच्छुकांनी रविवारी आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहनही शीतल यांनी केले आहे.
रविवारी आयोजित करण्यात आलेल्या ध्यानसाधनेत सहभागी होण्यासाठी करण्यासाठी संपर्क साधावा- प्रेमसाधना – 9964332199,शीतल- 9886631197