बेळगाव : सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर यांच्या हेल्प फॉर नीडी या प्रकल्पाच्या माध्यमातून शेरी गल्ली येथे राहणारे सुधीर पद्मन्नावर यांनी आपल्या मुलीच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाउंडेशनला मदत देऊ केली आहे.
रुग्णांना वेळेत ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा याकरिता त्यांनी सदर फाउंडेशनला ऑक्सीजन सिलेंडर आणि फ्लो मीटरची मदत केली आहे. त्यामुळे सुरेंद्र अनगोळकर यांनी त्यांचे आभार मानले आहेत. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त वायफळ खर्च न करता गरजूंना मदत करण्याच्या उद्देशाने त्यांनीही मदत केली असल्याचे यावेळी सांगितले.
Check Also
सुवर्ण महोत्सवी “ज्वाला” दिवाळी अंकाचे दिमाखात प्रकाशन
Spread the love बेळगाव : प्रतिकूल परिस्थितीत सुरू झालेली “ज्वाला”ची वाटचाल महोत्सवी वर्षापर्यंत पोचली आहे. …