बेळगाव : वार्ड क्रमांक 33 आणि 34 मध्ये मारण्यात आलेल्या कूपनलिका आणि पाण्याच्या टाकीचे पूजन आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते करण्यात आले.
या दोन्ही प्रभागातील नागरिकांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत होते. या भागातील पाणी समस्या दूर करावी, अशी मागणी येथील नागरिकांनी आमदार बेनके यांच्याकडे केली होती. या मागणीची पूर्तता करताना आमदार अनिल बेनके यांच्या प्रयत्नातून आणि आमदार फंडातून या दोन्ही प्रभागात कूपनलिका खोदाई करून पाणी साठविण्यासाठी पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या आहेत. शाहूनगर भागात मोडणाऱ्या या प्रभागातील त्या बोअरवेल आणि पाण्याच्या टाकीचे अनिल बेनके यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रभाग क्रमांक 33 च्या नगरसेविका रेश्मा प्रवीण पाटील, 34 चे नगरसेवक श्रेयश नाकाडी, प्रवीण पाटील, विजय कोडन्नावर, जयंत चोरगे, बसवराज हापली, नंद्याळकर, कम्मार, प्रशांत बिद्री, शीला गडकरी, मंजुळा हिरेमठ, सोलापुरे, वकील मारीहाळ, कोलेकर, सावनूर, ताराराणी महिला मंडळ, शाहूनगर महिला मंडळ सदस्या यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
