संकेश्वर (प्रतिनिधी) : कुंकू सौभाग्याचे लेणे आहे. ते कपाळावर लावण्यात लाज कसली? सौभाग्यावती महिलांना फॅशनेबल टिकली पेक्षा कुंकूच शोभून दिसते, असे श्रीरामसेनेचे हुक्केरी तालुका अध्यक्ष सुभाष कासारकर यांनी सांगितले.
ते गायकवाड मळा भागातील श्री रेणुका देवी मंदिरात आयोजित हळदीकुंकू कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी, सौ. अरुणा कुलकर्णी, नगरसेवक डॉ. मंदार हावळ, जयप्रकाश सावंत उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत सौ. रुपा नेताजी आगम यांनी केले. सुभाष कासारकर पुढे म्हणाले, आपली भारतीय संस्कृती महान आहे. त्याकरिता विदेशी महिला त्याचा अंगीकार करतांना दिसताहेत. याउलट भारतातील महिलांना विदेशी संस्कृती लय भारी वाटत आहे. त्यामुळे सौभाग्यवती महिला कुंकूपेक्षा फॅशनेबल टिकलीचाच स्विकार करताना दिसताहेत. फॅशनेबल टिकली लावताना कुंकू हे सौभाग्याचे लेणे आहे. याचा विसर मात्र होऊ देऊ नका असे त्यांनी सांगितले. यावेळी अरुणा कुलकर्णी यांनी हळदीकुंकू कार्यक्रमाचे महत्व समजावून सांगितले. कार्यक्रमाला सौ. लक्ष्मी शंकर गायकवाड, सविता सर्जेराव गायकवाड,शिवा जयसिंग आगळे, शकुंतला बोटे, संगिता सुभाष गायकवाड, मालूबाई महादेव गायकवाड, संगिता बाबासाहेब जाधव, संध्या सुरेश आगम, मळा भागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नेताजी आगम, सुरेश आगम सर्जेराव गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले.
Check Also
संकेश्वर नगरपालिका प्रभाग क्रमांक 21ची पोटनिवडणूक रंगणार
Spread the love संकेश्वर : नगरपालिकेच्या प्रभाग क्र. 21 मधील नगरसेवक जितेंद्र मर्डी यांचे निधन …