चंदगड : हलकर्णी ता. चंदगड येथे आज संग्रामदादा कुपेकर यांच्या समर्थकांची बैठक संपन्न झाली. सदर बैठकीमध्ये आगामी चंदगड तालुक्यातल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या संदर्भात चर्चा करण्यात आली.
आगामी निवडणूकीसंदर्भातील सर्व अधिकार संग्रामदादा कुपेकर यांनी घ्यावेत, असे यावेळी कार्यकर्त्यांनी ठरवले.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती मा. भरमान्ना गावडे साहेब हे होते.
याप्रसंगी संग्रामदादा कुपेकर यांच्या गटाचे प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
