भाजप बाजी मारेल असा व्यक्त केलाय किरण जाधव यांनी विश्वास
बेळगाव : गोवा विधानसभा पोर्वोरीम संघातून निवडणूक लढविणाऱ्या महसूल, आयटी, कामगार आणि रोजगार, योजना आणि सांख्यिकी खात्याचे माजी मंत्री रोहन अशोक कुंटे यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
माजी पालक मंत्री आणि विद्यमान आमदार रमेश जारकीहोळी तसेच राज्य भाजप ओबीसी युवा मोर्चाचे सचिव किरण जाधव यांनी या मतदारसंघाचा दौरा करून अशोक कुंटे यांचा प्रचार केला. यावेळी त्यांनी मतदारांच्या गाठी भेटी घेऊन रोहन अशोक कुंटे यांना मतदान करून भाजपचे हात बळकट करण्याचे आवाहन केले. या दरम्यान मतदारांचा भरघोस पाठिंबा मिळाल्याचे रमेश जारकीहोळी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
गोव्यात भाजपच बाजी मारेल, असा विश्वास किरण जाधव यांनी प्रचार दौऱ्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. या प्रचारादरम्यान अनुसुचित जातीचे नेते अशोक असोदे यासह स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
