खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराच्या जांबोटी क्राॅसवर जत- जांबोटी महामार्गाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू असल्याने रस्ता तसाच नादुरूस्त अवस्थेत आहे.
अद्याप या रस्त्याचे डांबरीकरण झाले नाही. की गटारी झाली नाही. त्यातच सीडीचेही काम अद्याप झालेले नाही.
गेल्या दोन वर्षांपासून रस्त्याचे काम झालेच नाही. केवळ या रस्त्यावर खडी पसरून नावापुरतेच काम केले जाते. पुन्हा काही दिवसात येरे माझ्या मागल्या अशी परिस्थिती होते.
खानापूर शहराच्या जांबोटी क्राॅसवरून जांबोटी, चोर्ला कणकुंबी, पारवाडसह अनेक गावाच्या बसेस, वाहने ये-जा करतात. रस्त्याची दुरावस्था झाल्याने याभागातील नागरिकांतून नाराजी पसरली आहे.
शिवाय जांबोटी क्राॅसवरून खोकीधारकानाही हलविण्यात आल्याने शहरातील नागरिकांतून कमालीची नाराजी पसरली आहे.
या नादुरूस्त रस्त्याकडे तालुक्याच्या आमदारांचे साफ दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे नागरिकांतून नाराजी पसरली आहे.
तब्बल दोन वर्ष पॅचवर्क व खडी पसरून काम केल्याचा बहाणा केला जात आहे.
तेव्हा संबंधित पीडब्ल्यूडी खात्याच्या अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन खानापूर शहराच्या जांबोटी क्राॅसवरील रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी सर्वथरातून होताना दिसत आहे.
