बेळगाव : प्रसिद्ध डॉक्टर, समर्पित समाजसेविका आणि कर्नाटक राज्य भाजप महिला मोर्चाच्या सेक्रेटरी डॉ. सोनाली सरनोबत यांना “वुमन ऑफ इम्पॅक्ट” हा प्रतिष्ठित पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. त्यांना समाजसेवा श्रेणीतील सन्मानासाठी निवडण्यात आले.
मंगळवार दि. १५ ऑक्टोबर २०२४ रोजी मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील राष्ट्रीय शेअर बाजारात सदर पुरस्कार वितरण समारंभ सोहळा पार पडला.
या प्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता जयकर, लागू बंधू ज्वेलर्सचे अध्यक्ष श्री दिलीप लागू, आणि बॅगिट ब्रँडच्या मालक माजी नीना लेखी यांच्यासह कार्यक्रमाच्या समन्वयक माजी रचना बगवे उपस्थित होत्या.
आशीषकुमार चौहान – व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, राष्ट्रीय शेअर बाजार, माजी अदिती तटकरे – महिला व बाल विकास मंत्री, महाराष्ट्र शासन, नीना लेखी – संचालक, बॅगिट आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.
विविध श्रेणीतील पुरस्कार विजेते असे
1. डॉ. अपूर्वा पालकर – कुलगुरू, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ.
2. हर्षदा सावंत – वरिष्ठ संपादक, सीएनबीसी आवाज.
3. डॉ. वंदना फडके – संचालक, फडके लॅबोरेटरीज.
4. पद्मश्री भाग्यश्री टिप्से – महिला आंतरराष्ट्रीय ग्रॅंडमास्टर.
5. डॉ. सोनाली सरनोबत – समाजसेवा व परोपकार.
6. अभिनेत्री स्मिता जयकर – जीवनगौरव पुरस्कार.
7. मेघना किचन – फूड इन्फ्लुएंसर.
8. वैदेही परशुरामी – मराठी अभिनेत्री.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. सोनाली सरनोबत बोलताना म्हणाल्या की, समाजसेवा आणि परोपकार करतांना फळाचीअपेक्षा ठेवू नये. तसेच या प्रवासात आपल्याला मिळालेल्या कुटुंबाच्या पाठिंब्याचे महत्त्व अधोरेखित केले.
त्या सोहळ्यासाठी त्यांच्या पती डॉ. समीर सरनोबत आणि मुलगा डॉ. श्रीज्योत सरनोबत यांच्यासोबत उपस्थित होते.