Friday , October 18 2024
Breaking News

वडिलांचा संशयास्पद मृत्यू; मुलीने केली पोलिसात तक्रार

Spread the love

 

बेळगाव : रिअल इस्टेट व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्ते संतोष पद्मन्नावर यांच्या मृत्यू प्रकरणी पत्नी उमा यांच्यावर संशय असल्याचा गंभीर आरोप संतोष यांच्या मुलीने केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संतोष पद्मन्नावर हे त्यांच्या कुटुंबीयांसमवेत महांतेशनगर, अंजनेयनगर परिसरात राहात होते. त्यांना पत्नी व तीन मुले असून मोठी मुलगी बंगळूर येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेते. उर्वरित दोन्ही मुले १३ व १५ वर्षांची आहेत. ९ ऑक्टोबर रोजी त्यांचा मृत्यू झाला. नैसर्गिक मृत्यू झाल्याचे जाहीर करून त्यांच्यावर त्याच दिवशी अंत्यसंस्कार करण्यात आले. सदाशिवनगर येथील लिंगायत स्मशानभूमीत त्यांच्या दफनविधीचे सोपस्कार पार पडले.

मुलीची ६ दिवसांनी तक्रार

हे सर्व घडल्यानंतर सहा दिवसांनी मंगळवारी अचानक मृताच्या १९ वर्षीय मुलीने आपल्या वडिलांचा मृत्यू नैसर्गिक नसून खून झाल्याचे सांगत माळमारुती पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी सकाळपासून याचा तपास सुरू केला आहे. पोलिसांनी रात्री उशिरा मुलीची फिर्याद नोंदवून घेत पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.

मृतदेह उकरून काढणार

या प्रकरणाची नोंद करून घेतल्यानंतर पुढील प्रक्रिया निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यांच्याकडून सुरू आहे. नैसर्गिक मृत्यू आता अनैसर्गिक मृत्यूत परावर्तीत झाल्याने त्यानुसार याची नोंद करून घेतली आहे. पुढील तपासासाठी आज हा मृतदेह उकरून बाहेर काढून तो उत्तरीय तपासणीसाठी पाठवला जाणार आहे. शिवाय काही नमुने तपासासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवले जातील. यामध्ये जे स्पष्ट होईल, त्यावर पुढील कारवाई ठरणार आहे. परंतु, खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर मंगळवारी मृताची पत्नी व अन्य दोघांची पोलिस ठाण्यात आणून चौकशी केल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

वैश्यवाणी समाजातर्फे कोजागिरी पौर्णिमा साजरी

Spread the love  बेळगाव : श्री समादेवी संस्थान, वैशवाणी समाजातर्फे बुधवारी रामनाथ मंगल कार्यालयात कोजागिरी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *