Friday , March 6 2026
Breaking News

श्री महांतेश कवठगीमठ सौहार्द सहकारी संघ नियमीत, बेळगाव शहापूर शाखेचा उदघाटन सोहळा २४ रोजी

Spread the love

 

बेळगाव : श्री महांतेश कवठगीमठ सौहार्द सहकारी संघ नियमीत, बेळगाव शहापूर शाखेचा उदघाटन सोहळा गुरुवार दि. २४ ऑक्टोबर २०२४ दुपारी ३.३० वाजता सरकारी चिंतामणराव पदवीपूर्व महाविद्यालय, शहापूर, बेळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.
शाखेचे उदघाटन बेळगाव दक्षिणचे आमदारश्री. अभय पाटील यांच्या हस्ते होणार असून प्रमुख उपस्थिती म्हणून बेळगावच्या महापौर श्रीमती सविता कांबळे, उपमहापौर श्री. आनंद चव्हाण, मराठा बँकेचे चेअरमन श्री. दिगंबर पवार, पायोनियर को-ऑपरेटिव्ह बँकचे चेअरमन श्री. प्रदीप अष्टेकर, दानम्मा मंदिर समिती अध्यक्ष श्री. चंद्रशेखर बेंबळगी, नगरसेवक श्री. गिरीश धोंगडी, संचालक कर्नाटक राज्य सौहार्द संयुक्त सहकारी नि., बेंगळूर आणि उपाध्यक्ष कर्नाटक राज्य सहकारी महामंडळ नि., बेंगळूर श्री. जगदीश एम. कवठगीमठ उपस्थित राहणार आहेत. तरी सर्वांनी उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन श्री. महांतेश कवठगीमठ सौहार्द सहकारी संघ नियमीत, बेळगावचे संस्थापक श्री. महांतेश कवठगीमठ, अध्यक्ष श्री. शरतचंद्र एम. कवठगीमठ, उपाध्यक्ष श्री. राजेंद्र मुतगेकर, संचालक श्री. सचिन हंगीरगेकर, श्री. चंद्रशेखरय्या सवडी, श्री. मंजुनाथ शिरोडकर, श्री. प्रसन्नकुमार लट्टे, श्री. उदय मुतकेकर, श्री. नितीश धडोती, श्री. राधेश्याम सारडा, श्री. मनोहर भांडगे, श्री. विशाल बागी आदींनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

श्री तुकाराम को-ऑप. बँकेत तुकाराम बीज कार्यक्रम

Spread the love  बेळगाव : शहापूर परिसरातील सर्वसामान्य जनता, शेतकरी तसेच नागरिकांच्या मनात मानाचे स्थान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *