खानापूर (प्रतिनिधी) : नेहमीच चर्चेत असलेल्या खानापूर-रामनगर महामार्गाची नुकताच झालेल्या मुसळधार पावसाने दुरावस्था झाली आहे.
त्यामुळे लोंढा-रामनगर भागातील नागरिकांना खानापूर, बेळगाव प्रवास करणे शक्यच नाही आहे.
सध्या काही भागात पॅचवर्कचे काम करण्यात येत आहे. याची पाहणी माजी जिल्हा पंचायत सदस्य बाबूराव देसाई यांनी शुक्रवारी प्रत्यक्षात कामाची पाहणी केली.
यावेळी संबंधित कंत्राटदाराला जाब विचारत खानापूर- रामनगर रस्त्यावर ज्या ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत त्याकडे लक्ष द्या. तेथील खड्डे बुजवा. लोकाना, वाहनांना ये-जा करण्यासाठी पॅचवर्कचे काम करा, असे सांगितले.
खानापूर-रामनगर महामार्गासाठीच्या पॅचवर्कसाठी ४ कोटी ९२ लाख रूपये खासदार अनंतकुमार हेगडे यांनी मंजूर केले आहे. मात्र संबंधित कंत्राटदार हलगर्जीपणा करत कामाला लागत आहे. ज्याठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. त्या ठिकाणी पॅचवर्कचे काम करा. जर तुम्हाला जमत नसेल तर मला एक जेसीबी व १० टीपर द्या. मी हे काम करून दाखवतो, असे माजी जिल्हा पंचायत सदस्य बाबूराव देसाई यांनी बोलून दाखविले. यावेळी कंत्राटदाराच्या हलगर्जीपणाचा कळस झाला, असे ते म्हणाले.
पाहणी वेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य बाबूराव देसाई, सदानंद हेरेकर, रमेश कांबळे, सामाजिक कार्यकर्ते आप्पाणा गोरल, तानाजी गोरल आदी उपस्थित होते.
प्रतिक्रिया
खानापूर रामनगर महामार्गाचे पॅचवर्कचे काम करण्याकडे संबंधित कंत्राटदाराचा हलगर्जीपणा होत आहे. या महामार्गावरील मोठे खड्डे पॅचवर्क करून बुजवावे. अन्यथा महामार्ग वाहतुकीस लायक राहणार नाही. त्यामुळे खानापूर रामनगर या महामार्गावरील वाहतूक कायमची टप्प होणार आहे. त्यामुळे जनता पुन्हा रस्त्यावर येणार यासाठी संबंधित कंत्राटदाराने पॅचवर्कचे काम सुरूळीत करावे.