येळ्ळूर : शनिवार दि. 05/02/2022 रोजी येळ्ळूर ग्राम पंचायत येथे मागील एक वर्षाच्या विकासकामाच्या वर्षपूर्ती निमित्त ग्राम पंचायत कार्यालयामध्ये कार्यक्रम आयोजित करून वर्षपूर्ती विकासकामाच्या अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. प्रथमतः येळ्ळूर गावचे अध्यक्ष सतीश पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत पीडिओ अरुण नाईक व सर्व सदस्यांनी केले. यानंतर पीडिओ अरुण नाईक यांचे स्वागत अध्यक्ष सतीश पाटील यांनी केले.
यावेळी ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांनी पुढील कामाचा केलेला संकल्प सर्व ग्राम पंचायत सदस्यांना, कर्मचारी वर्ग व गावातील नागरिक या सर्वांच्या सहकार्यातून केलेला संकल्प पूर्ण करण्याचे प्रयत्न करीन तसेच नवीन सरकारी निधी जास्तीतजास्त उपलब्ध करून गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रयत्न करीन. यावेळी पंचायती अभिवृद्धी अधिकारी अरुण नाईक यांनी पुढील संकल्पाला चालना देऊन पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली. तसेच ज्येष्ठ ग्राम पंचायत सदस्य शिवाजी नांदूरकर यांनी येळ्ळूर गावच्या विकास संदर्भात सर्व सदस्य सदस्या एकजुटीने राहून गावाच्या विकास कामांना चालना देऊया असे त्यांनी विचार व्यक्त केले. तसेच ग्राम पंचायत सदस्य प्रमोद पाटील यांनी झालेल्या विकास कामांचे कौतुक करून पुढील विकासकामे जिद्दीने व सर्वांच्या सहकार्यातून गावचा सर्वांगीण विकास कामे पूर्ण करू असे विचार व्यक्त केले तसेच ग्राम पंचायत सदस्य रमेश मेणसे, शशीकांत धुळजी, कल्लाप्पा मेलगे, यांनीही गावच्या विकासकामासंदर्भात आपले विचार मांडले. यावेळी उपस्थित ग्राम पंचायत सदस्य प्रमोद पाटील, रमेश मेणसे, शिवाजी नांदूरकर, जोतिबा चौगुले, शशीकांत धुळजी, कल्लाप्पा मेलगे, राजू डोंन्यानावर, विलास बेडरे, मनीषा घाडी, सुवर्णा बिजगरकर, शालन पाटील, वनिता परीट, सोनाली येळ्ळूरकर, लक्ष्मी कणबरकर, पीडिओ अरुण नाईक, सचिव सदानंद मराठे, सर्व ग्राम पंचायत कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक सचिव सदानंद मराठे यांनी केले व आभार प्रमोद पाटील यांनी मांडले.
Check Also
पंचमसाली आरक्षणासाठी १८ रोजी ‘चलो बेंगळुरू’ची हाक : बसवजय मृत्युंजय स्वामी
Spread the love बेळगाव : गेल्या वर्षभरापासून पंचमसाली समाजाचे २ए आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन सुरु …