बेळगाव : बेळगाव तहसीलदार कार्यालयातील क्लार्कने केलेल्या आत्महत्येनंतर मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या नावावरून विरोधकांनी राजकारण सुरु केले असून रुद्रण्णाशी कधीही आपला संपर्क झाला नाही, याप्रकरणी राजकीय आरोप निष्फळ असून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी केली जावी, अशी प्रतिक्रिया लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली.
बुधवारी बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी स्पष्ट केले की त्या तहसील कार्यालयातील एसडीए रुद्रण्णाला कधीही भेटल्या नाहीत. हेब्बाळकर म्हणाल्या, “अशा घटना घडू नयेत. मला या घटनेची माहिती फक्त माध्यमांतून मिळाली. काल मी दिवसभर व्यस्त होते. मंत्री एच.के. पाटील हे देखील काल बेळगावमध्ये उपस्थित होते. मी रुद्रेशला कधीही भेटले नाही, कोणत्याही कामासाठी त्याच्याशी संपर्क साधला नाही. प्राथमिक तपास सुरू झाला आहे. एखाद्या मंत्र्याकडे 10-15 पीए असणे स्वाभाविक आहे. आम्ही फील्ड वर्क आणि इतर कामांसाठी पीए नियुक्त केले आहेत. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. रुद्रण्णाच्या कुटुंबीयांना मी सांत्वन आणि धीर देईन, असे त्या म्हणाल्या. रुद्रण्णाच्या आत्महत्या प्रकरणाची नि:पक्षपातीपणे चौकशी व्हावी, अशी माझी इच्छा आहे. मी पोलीस अधिकारी आणि जिल्हा आयुक्तांच्या सतत संपर्कात आहे. सत्य बाहेर यावे आणि रुद्रण्णाच्या कुटुंबाला न्याय मिळावा, तहसीलदार कार्यालयातील गैरकारभाराची चौकशी करण्याची रुद्रेशची विनंती होती. यानुसार या सर्व प्रकाराची चौकशी झाली पाहिजे, असे मंत्री हेब्बाळकर म्हणाल्या.हेब्बाळकर यांच्या राजीनाम्याची भाजप मागणी करत असून यावर बोलताना त्या म्हणाल्या, मी भाजपला आंदोलन करू नका असे म्हणत नाही. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या नावाचा कुठेही उल्लेख आहे की नाही हे समजून घेतले पाहिजे. रुद्रण्णा लक्ष्मी हेब्बाळकर कुठे म्हणाले होते का? लक्ष्मी हेब्बाळकर यांना ही बाब माहीत नसल्याचे खुद्द रुद्रण्णांनी सांगितले. चौकशीअंती सर्व काही कळेल. मंत्री ईश्वरप्पा आणि या प्रकरणात बराच फरक आहे. ईश्वरप्पा यांच्या प्रकरणात थेट ईश्वरप्पा यांच्या नावाचा उल्लेख होता. या प्रकरणात रुद्रेशचा मोबाईल मिळायला हवा, पुरावे मिळायला हवेत. तपासाच्या टप्प्यात जास्त बोलणे रास्त नाही. तुम्हीही सहकार्य करा, मीहि सहकार्य करेन आणि दोषींना शिक्षा नक्कीच होईल, असे त्या म्हणाल्या. रुद्रण्णा यांनी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची भेट घेण्याच्या प्रयत्न केला होता. याबाबत उत्तर देताना त्या म्हणाल्या, ते घरी का आले ते मला माहीत नाही. सकाळी ऑफिसमध्ये हजारो लोक भेटीसाठी येतात. मी विविध कार्यक्रमांसाठी गेल्याने याबाबत मला अधिक माहिती नाही, असे त्या म्हणाल्या.