Tuesday , March 3 2026
Breaking News

सौंदती रेणुकादेवी यात्रेत सोयी सुविधा उपलब्ध करून द्या

Spread the love

 

कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेचे प्रशासनाला साकडे

बेळगाव : पुढील महिन्यात १२ ते १४ डिसेंबर दरम्यान सौंदत्ती येथील श्री रेणुका देवीचे यात्रा संपन्न होत आहे. या पार्श्वभूमीवर यात्रा काळात मोठ्या संख्येने येणाऱ्या कोल्हापूर आणि महाराष्ट्रातील रेणुका भक्तांच्या सोयी सुविधांची दखल घेत प्रशासनाने योग्य ती व्यवस्था करावी, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात संघटनेच्या वतीने आज गुरुवारी बेळगावचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन देण्यात आले
कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज शुक्रवारी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस कार्यालयाला भेट दिली.
यावेळी संघटनेच्या वतीने यात्रा काळातील समस्या संदर्भात निवेदन देण्यात आले. सदर निवेदनात यात्रा काळात कोल्हापूर आणि महाराष्ट्रातून येणाऱ्या बसेस तसेच साहित्य घेऊन येण्याचा अवजड वाहनाना डोंगरावर प्रवेश दिला जावा. पार्किंगची व्यवस्था करण्यात यावी. यात्रा काळात पिण्याचे पाणी, वीज, स्वच्छता,पथदीप, देवी दर्शन, महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह तसेच महिला पोलिस व्यवस्था करण्यात यावी, मराठी भाषेतील माहिती फलक या संदर्भात विशेष उपाययोजना हाती घेण्यात याव्या.
पौर्णिमा यात्रेला तीन लाखाहून अधिक भाविक सौंदत्ती डोंगरावर उपस्थित असतात. त्यामुळे यात्रा काळात शांतता सुव्यवस्था अबाधित राहावी. चोरट्यांच्या कारवाया आळा बसावा. यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष खबरदारी घ्यावी, अशी ही मागणी यावेळी करण्यात आली.
निवेदनाचा स्वीकार करून बोलताना सौंदत्ती रेणुका देवी यात्रा संदर्भात लवकरच बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीत कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेने सादर केलेल्या निवेदनातील मागण्यांची दखल घेतली जाईल, असे जिल्हाधिकारी कार्यालय शिरस्तेदार फ्रँकी यांनी सांगितले.
जिल्हा पोलीस कार्यालय अधीक्षक यांनी, सौंदत्ती रेणुका देवी यात्रा काळात प्रशासनाच्या वतीने यात्रेकरूंच्या सोयीसुविधांची काळजी घेत असते, पोलीस प्रशासन यात्रा काळात भाविकांच्या सुरक्षिते संदर्भात त्याचबरोबर वाहतुकीच्या संदर्भात उपाययोजना हाती घेतल्या जातील, असे त्यांनी सांगितले.

यावेळी कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेचे अध्यक्ष सुभाष जाधव, उपाध्यक्ष सरदार जाधव, कार्याध्यक्ष अशोकराव जाधव, सरचिटणीस दयानंद घबाडे, चिटणीस तानाजी चव्हाण, अच्युतराव साळोखे,आनंदराव पाटील, केशव माने, गजानन विभुते, रमेश बनसोडे, मोहन तात्या साळोखे, केशव माने, शालिनी सरनाईक, लता सोमवंशी व अन्य सदस्य यावेळी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

“सीमालढा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवू” : हेमंत ढोमे यांची बेळगावकरांना ग्वाही

Spread the love  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगावच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *