बेळगाव : यमकनमर्डी पोलिसांनी दोन ठिकाणी झालेल्या सोने चोरीच्या घटनांचा उलगडा करत तीन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत ५५ ग्राम सोने जप्त करण्यात आले आहे.
यमकनमर्डी पोलिसांनी दोन वेगवेगळ्या सोने चोरीच्या घटनांची उकल केली आहे. हुक्केरी तालुक्यातील इस्लामपूर येथील अडिवेप्पा लागमप्पा बागराई यांचे ३० ग्राम सोने चोरीला गेले होते. यमकनमर्डी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू करत चोरी करणाऱ्यांना अटक केली. याचप्रमाणे सविता बसवराज नगार यांच्याकडे झालेल्या २५ ग्राम सोने चोरीचा तपास लावला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले असून चोरीला गेलेली ५५ ग्राम सोने जप्त केले आहे. यमकनमर्डी पोलिसांनी आरोपींचा तपास सुरू करत लक्ष्मीकांत कृष्णप्पा बेडरत्ती, ईरप्पा रवी नायक आणि संजय सुरेश गडदक्की या आरोपींना ताब्यात घेतले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta