बेळगाव : बेळगावच्या प्रथमेश पाटील यांना केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते रक्षा राज्यमंत्री पदक देऊन सन्मानित करण्यात आले आहे. प्रथमेश यांनी दाखवलेल्या साहसी कार्याबद्दल त्यांना हे पुरस्कार हे पदक देऊन सन्मानित करण्यात आले आहे. गणेशपुर गल्ली शहापूर येथील प्रथमेश पाटील हे एनसीसीच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्यात भाग घेत यापूर्वीही अनेक पुरस्कार मिळविले आहेत. प्रथमेश यांना डिसेंबर 2020 मध्ये रक्षा राज्यमंत्री पदक जाहीर करण्यात आले होते. मात्र या काळात केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचा अपघात झाल्यामुळे पदकाचे वितरण झाले नव्हते. त्यामुळे एक वर्षानंतर म्हणजे डिसेंबर 2021 मध्ये प्रथमेश यांना गोवा येथे बोलावून त्याचा सन्मान करून त्याला हे पदक बहाल करण्यात आले. यावेळी एनसीसी कर्नल राजीव खजुरिया ग्रुप कमांडर के. श्रीनिवास कर्नल आदित्य कुमार वर्मा यांच्या हस्ते त्यांना हे पदक देण्यात आले.
Check Also
आनंदनगर नाल्यासंदर्भात लोकप्रतिनिधींकडून जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न
Spread the love बेळगाव : आनंदनगर – वडगाव येथील नाल्याचे बांधकाम खासगी जागेतून का करण्यात …