बेळगाव : बाग परिवारचा नोव्हेंबर महिन्यातील कार्यक्रम रविवार दिनांक 24 रोजी बसवेश्वर गार्डन गोवावेस येथे मोठ्या उत्साहात पार पडला. सौ. अस्मिता आळतेकर यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आयुष्याचा जोडीदार, लगीनघाई, हिवाळा अशा विविध विषयांवरील सुंदर कवितांचे बहारदार सादरीकरण उपस्थित कवी – कवयित्रींनी मोठ्या उत्साहाने केले. पावसाळ्यानंतर प्रथमच कार्यक्रम बागेत पार पडला.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शीतल पाटील, सुत्रसंचालन मनिषा मोरे यांनी केले. तर आभार अपर्णा पाटील मानले. अध्यक्षस्थानी गुरुनाथ किरमीटे होते.
कार्यक्रमाची सुरुवात नव्यानेच दाखल झालेल्या स्नेहल बर्डे यांच्या घटनेचे शिल्पकार या कवितेने झाली. मनिषा मोरे – माझी प्रिया, अपर्णा पाटील- आशिर्वाद, अस्मिता आळतेकर- संसार, चंद्रशेखर गायकवाड- अग्नीकुंड, अशोक सुतार- रचलेल्या विचारांचा थाट, गुरुनाथ किरमीटे- स्वानुभव, मनिषा नाडगौडा- का वाटावी लाज, डाॅ. प्रेमा मेणशी – माय मराठी, शीतल पाटील- एकाकीपणा, स्मिता किल्लेकर- अनुराग, शुभदा खानोलकर- गजाल गावातल्या पोरांची, रोशनी हुंदरे- चार भिंतीचे घरपण, डाॅ.मेघा भंडारी- जीवाभावाचा मैतर अशा विविध अंगी कविता सादर करण्यात आल्या.
सदर कार्यक्रमास भाविका भंडारी, सौ. शैला तेंडुलकर, प्राची तेंडुलकर हे काव्यरसिक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta