बेळगाव : महांतेशनगर येथील केएमएफ डेअरीजवळ टिळकवाडी येथील प्रणीत कुमार (वय 31) द्वारकानगर, टिळकवाडी याच्यावर दोन राऊंड गोळीबार करण्यात आला असून गोळीबार करून हल्लेखोर फरार झाले आहेत.
प्रणित कुमार ह रात्री जेवणासाठी डेअरीजवळ उभा असताना ही घटना घडली आहे. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी दोन राऊंड गोळीबार करून पळ काढला. प्रणीत कुमार याच्या पायाला गोळी लागली आहे. व्यक्तीगत भांडणातून त्याच्यावर गोळीबार करण्यात आला असल्याचे समजते. त्याला बेळगाव जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
पोलिस आयुक्त याडा मार्टिन मारबानियांग आणि इतर पोलिस अधिकाऱ्यांनी हॉस्पिटलला भेट दिली असून जखमींकडून घटनेची सविस्तर माहिती घेतली आहे. याप्रकरणी माळमारुती पोलीस पुढील तपास करीत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta