
बेळगाव : सन्मित्र फौंडेशन येळ्ळूर यांच्यावतीने रविवार दिनांक 1 डिसेंबर 2024 रोजी स्पर्धेची सुरुवात सकाळी 9 वाजता होणार आहे. मुला-मुलींसाठी खुल्या गटात बेळगांव जिल्हा मर्यादित भव्य खो-खो स्पर्धा नवहिंद क्रिडा केंद्र मैदान-महाराष्ट्र हायस्कूल समोर, आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
सदर स्पर्धेसाठी प्रवेश फी रु. 501/- असुन दोन्ही गटांसाठी अनुक्रमे रु.10,001/- व चषक, रु. 7,001/- व चषक आणि रु. 5,001/- व चषक अशी तीन बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तसेच दोन्ही गटांसाठी उत्कृष्ठ खेळाडू, उत्कृष्ट रनर, उत्कृष्ट चेजर यासाठी सुद्धा आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत तरी हौशी संघांनी पुढील मोबाईल क्रमांकांवर सहभाग नोंदवावा 7204707623, 7019664730, 9620309689
Belgaum Varta Belgaum Varta