बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यातील मुरगोड गावाच्या शिवारात पहाटे एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली.
सोहिल अहमद कित्तूर (17) असे मृत युवकाचे नाव असून तो मुरगोड येथे चायनीजची गाडी लावत होता. किरकोळ वादातून त्याची चाकूने वार करून हत्या गावातील पाच तरुणांनी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मुरगोड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन श्वान पथक व ठसे तज्ञांनी भेट देऊन पाहणी सुरू केली आहे.