बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणने मन्नूर येथील अंगणवाडीतील 100 मुलांना स्वेटर्स प्रदान केले. श्रीमती आशा पत्रावळी यांनी आपल्या आई कै. रुक्मिणी रामू देवनावर यांच्या स्मरणार्थ दिलेल्या देणगीतून सदर उपक्रम राबविण्यात आला.
आशा पत्रावली या बेळगाव येथील एक कल्पक आणि हुशार विणकर आहेत. विणकाम क्षेत्रात आणि विणकाम करून त्यांच्या अप्रतिम आणि अनोख्या निर्मितीसाठी त्यांना अनेक विक्रमांनी प्रमाणित केले आहे आणि अनेक नामांकित संस्थांकडून सन्मानित करण्यात आले आहे.
आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आरसीबी दर्पणच्या अध्यक्षा आरटीएन रुपाली जनाज यांनी उपस्थितांंचे स्वागत करूून आशा पत्रावळी यांची ओळख करून दिली. उद्योजक आर. एम. चौगुले यांनी मन्नूर जनतेच्या वतीने रोटरी क्लब ऑफ बेळगांव दर्पणचे तसेच आशा पत्रावळी यांचे आभार मानले.
सौ.प्रीती चौगुले, रो. सविता वेसणे, मन्नूर येथील मान्यवर मंडळी, स्वेेटर क्लासच्या विद्यार्थीनी, आंगणवाडी शिक्षिका, विद्यार्थी व त्याचे पालक उपस्थित होते. रो. सविता हेब्बर यांनी उपस्थितांचे आभार मानले.