बेळगाव : बेळगाव येथे 9 डिसेंबर ते 20 डिसेंबर दरम्यान विधिमंडळ अधिवेशन पार पडणार आहे. विधानसभा अध्यक्ष यु. टी. खादर यांनी पत्रकारांशी बोलताना यासंदर्भात आपले विचार मांडले.
उद्यापासून कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर आज रविवारी दुपारी यु. टी. खादर यांनी सुवर्णसौधला भेट देऊन तेथील अधिवेशन पूर्वतयारीची माहिती घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, पहिल्या दिवशी सभागृहातील कामकाजापूर्वी 10.30 वाजता, मुख्यमंत्री अनुभव मंटप स्मृतीच्या मोठ्या तैलचित्राचे अनावरण करतील. विधानसभा अध्यक्ष, विधानपरिषद सभापती, उपसभापती, जिल्हा प्रभारी मंत्री यांच्यासह अनेक मान्यवर या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
त्यानंतर अकरा वाजता कामकाजाला सुरुवात होईल. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत निवडून आलेल्या विधानसभा सदस्यांना शपथ दिली जाईल. यावेळी अधिवेशनात 5 विधेयकांवर दीर्घ चर्चा होणार आहे. आतापर्यंत 3004 प्रश्न, 205 लक्षवेधी, 96 नियम 351 नोटिसा प्राप्त झाल्या आहेत असे खादर यांनी स्पष्ट केले.