बेळगाव : फिनिक्स स्पोर्ट्स कौन्सिल आयोजित 12 वी फिनिक्स चषक 17 वर्षाखालील माध्यमिक आंतरशालेय मुलांच्या फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद सेंट झेवियर्स स्कूल संघाने सलग तिसऱ्यांदा पटकावत हॅट्रिक केली. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात सेंट झेवियर्स स्कूल संघाने पोतदार इंटरनॅशनल स्कूल संघाचा पराभव केला. दुसऱ्या सामन्यात ईशान घाटगे याने नोंदविलेल्या एकमेव विजय गोलामुळे डी पी एम स्कूल संघाचा 1-0 असा पराभव केला. रूपांतर पूर्व सामन्यात सेंट झेवियर्स स्कूल संघाने एमव्हीएम स्कूल संघावर 1-0 असा निसटता विजय मिळविला. हा एक मी विजयी गोल अर्जुन सानीकोपने नोंदविला. उपांत्य सामन्यात सेंट झेवियर्स स्कूल संघाने कनक मेमोरियल स्कूल संघावर 3-0 असा विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. यावेळी अर्जुन सानीकोप, हरसलन मुल्ला, ईशान घाटगे यांनी प्रत्येकी 1 गोल नोंदविले. अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात सेंट झेवियर्स स्कूल संघाने इस्लामिया स्कूल संघाचा पेनल्टी शूटआउट वर 5-4 असा पराभव करत विजयाची हॅट्रिक साधली. सेंट झेवियर स्कूल संघातर्फे अर्जुन सानीकोप, रोजन उचगावकर, ईशान घाटगे, तेजसराज निंबाळकर, माहित भडकली यांनी गोल केले. अजिंक्यपद विजेत्या सेंट झेवियर्स स्कूल संघाला ज्येष्ठ फुटबॉल प्रशिक्षक रविशंकर मालशेट, मानस नायक यांचे बहुमूल्य मार्गदर्शन तर शाळेचे प्राचार्य फादर सिरीयल ब्रेग्ज व क्रीडा शिक्षक चेस्टर रोजारिओ तसेच जुलेट फर्नांडिस यांचे प्रोत्साहन मिळत आहे. या संघात ऊझर रोटीवाले, अर्जुन सानिकोप, सुफियान बिस्ती, रेहान शेख, शफ माडीवाले, माहिद भडकली, तेजसराज एन, रुजेन उचगावकर, गौरव गोदवाणी, ईशान घाडगे, समर्थ भंडारी, ओम पुजारी, जैन मुल्ला, जुनेद, अरसनल मुल्ला, उमर फारूक यांचा समावेश आहे.
Belgaum Varta Belgaum Varta