बेळगाव : अनसुरकर गल्ली, बेळगाव येथील कॅपिटल वन या संस्थेच्यावतीने सालाबादप्रमाणे एस्. एस्. एल. सी. च्या विद्यार्थ्यासाठी व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. बेळगाव आणि परिसरातील शालेय परीक्षेत अनुक्रमे पहिले पाच क्रमांक मिळविलेले व त्याचबरोबर शैक्षणिक दृष्ट्या मागसलेल्या पाच विद्यार्थ्यानां या व्याखानमालेचा लाभ घेता येणार आहे. रविवार दि. १५/१२/२०२४ पासून रविवार दि. १९/०१/२०२५ या कालावधीत दर रविवारी सकाळी ठीक ८.१५ ते १२.०० या वेळेत भरविण्यात येणार आहेत. सदर व्याख्यानमालेच्या उदघाटनाचा कार्यक्रम रविवार दि. १५/१२/२०२४ रोजी सकाळी ८.०० वाजता ज्योती महाविद्यालयातील सभागृहात संचालक मंडळ व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. असे संस्थेचे चेअरमन श्री. शिवाजीराव हंडे यांनी कळविले आहे.
एस्. एस्. एल. सी. व्याख्यानमाला वेळापत्रक पुढीलप्रमाणे
दिनांक
रविवार : १५/१२/२०२४, वेळ : ८.१५ ते १२.००, विषय : मराठी
रविवार : २२/१२/२०२४, वेळ : ८.१५ ते १२.००, विषय : गणित
रविवार : २९/१२/२०२४, वेळ : ८.१५ ते १२.००, विषय : इंग्रजी
रविवार : ०५/०१/२०२५, वेळ : ८.१५ ते १२.००, विषय : कन्नड
रविवार : १२/०१/२०२५, वेळ : ८.१५ ते १२.००, विषय : विज्ञान
रविवार : १९/०१/२०२५, वेळ : ८.१५ ते १२.००, विषय : समाज-विज्ञान आणि सांगता समारंभ.
संस्थेकडे, शाळा मुख्याध्यापकांनी केलेल्या विद्यार्थी विद्यार्थीनींच्या नोंदणी प्रमाणे बहुसंख्य विद्यार्थी या व्याखानमालेचा लाभ घेणार असून सर्व विद्यार्थी वर्गानी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.