बेळगाव : ऑल कर्नाटक युनायटेड ख्रिश्चन फोरम फॉर ह्युमन राइट्स कमिशन फॉर इक्यूमेनिझम आणि सेंट्रल मेथोडिस्ट चर्च बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. 15 डिसेंबर रोजी युनायटेड ख्रिश्चन ख्रिसमस सेलिब्रेशनचे आयोजन करण्यात आले आहे. मेथोडिस्ट चर्च येथे संध्याकाळी 6 वाजता या उत्सवाला सुरुवात होईल. बेळगावचे बिशप मोस्ट रेव्ह डॉ. डेरेक फर्नांडिस येशू, आशेचा राजकुमार या थीमवर ख्रिसमस संदेश देणार आहेत.
“दर वर्षाप्रमाणे सर्व ख्रिश्चन, सर्व संप्रदाय आणि पंथांनी एकत्र येऊन नाताळ साजरे करण्यासाठी आणि बेळगाव शहराला संदेश देण्यासाठी हा एक प्रसंग आहे. या कार्यक्रमात सर्व चर्चमधील कॅरोल्स, नृत्य, व नातालमय झालेली असेल. युनायटेड ख्रिश्चन फोरम फॉर ह्युमन राइट्स व शहारातील विविध चर्चच्या सर्व संयोजकांसह तुम्हाला या अद्भुत कार्यक्रमासाठी हार्दिक आमंत्रण देत आहे,” फादर प्रमोद कुमार म्हणाले.
या उत्सवाविषयी बोलताना बिशप डेरेक फर्नांडिस म्हणाले की, जगभरातील ख्रिश्चन लोक येशू ख्रिस्ताच्या जन्माचे जयंती वर्ष साजरे करत असल्याने या उत्सवाला विशेष महत्त्व आहे.
“चर्चमध्ये येशू ख्रिस्ताच्या सर्व अनुयायांचा मेळावा येशू ख्रिस्तामध्ये तारण करण्याच्या कृतीवर विश्वास व्यक्त करण्यासाठी एका छत्राखाली एकत्र येत आहेत .येशू ख्रिस्ताने एकमेव चर्चची स्थापना केली आणि काही ऐतिहासिक कारणांमुळे चर्चचे विविध भाग विविध प्रकारे येशूची उपासना करत आहेत. या वर्षी आम्ही येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या 2025 व्या जयंती वर्षाची सुरुवात करत आहोत आणि या संदर्भात या एकत्र येण्याला आणखी महत्त्व प्राप्त होईल,” बिशप फर्नांडिस म्हणाले