येळ्ळूर : येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने बेळगाव परिसरातील व तालुक्यातील विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येते की, प्रत्येक वर्षी येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने विद्यार्थ्यांना विविध पुरस्कार दिले जातात. त्यामध्ये सीमाभागात दहावी परीक्षेत मराठी विषयात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास रोख रक्कम व स्मृतिचिन्ह देण्यात येते. त्याचबरोबर येळ्ळूर येथील श्री शिवाजी विद्यालय केंद्रात दहावी परीक्षेत प्रथम, द्वितीय, तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना, तसेच याच केंद्रात मराठी विषयात प्रथम, द्वितीय व तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम व स्मृतिचिन्ह देण्यात येते. या सर्व विद्यार्थ्यांना प्रा. वाय एन मेणसे व बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर किरण धामणेकर यांच्याकडून बक्षिसे दिली जातात. तेव्हा गुणवंत विद्यार्थ्यांनी दहावी गुणपत्रिकेच्या झेरॉक्स प्रतिवर संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांची सही व शिक्का घेऊन, येळ्ळूर येथील श्री शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक एम बी बाचीकर यांच्याकडे 27 डिसेंबर पर्यंत जमा करावीत, असे आवाहन येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने करण्यात आले आहे.