बेळगाव : दिनांक 20 डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या नमराठा को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बेळगावच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी सत्ताधारी पॅनेलच्या प्रचाराला वेग आला असून आज सकाळी कुद्रेमनी येथे सर्व सत्ताधारी पॅनेलच्या उमेदवारांनी प्रचार केला. यावेळी श्री भाग्यलक्ष्मी को-ऑपरेटिव्ह सोसायटी कुद्रेमनी येथे सर्व उमेदवारांचे स्वागत करण्यात आले. श्री. शिवाजीराव शिंदे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. यावेळी बाळासाहेब काकतकर यांनी कै. शिवाजीराव काकतकर, कै. अर्जुनराव हिशोबकर, कै. बाबुराव हंडे, कै. अर्जुनराव घोरपडे यांचे पुण्यस्मरण करून बँकेचे आणि कुद्रेमनी गावचे पूर्वापार असलेल्या ऋणानुबंधांची आठवण करून दिली. त्यानंतर कुद्रेमनी येथील भाग्यलक्ष्मी को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या नवनिर्वाचित संचालकांचा सन्मान करण्यात आला. तसेच मराठा को-ऑपरेटिव्ह बँकेत बिनविरोध निवडून आलेले प्रशांत चिगरे यांचा देखील सत्कार करण्यात आला. श्री. नागेश राजगोळकर यांनी मतपत्रिकेविषयी माहिती दिली.
श्री. रवी पाटील यांनी सांगितले की, कुद्रेमनी गावचे आणि मराठा को-ऑपरेटिव्ह बँकेचे एक जिव्हाळ्याचे नाते आहे. त्यामुळे संपूर्ण ग्रामस्थ हे मराठा को-ऑपरेटिव्ह बँकेच्या सत्ताधारी पॅनेलच्या पाठीशी नेहमीच असणार आणि सत्ताधारी पॅनेलचाच विजय होणार असल्याची ग्वाही दिली. बँकेचे विद्यमान चेअरमन श्री. दिगंबर पवार यांनी कै. ईश्वर गुरव यांची आज कमतरता भासत आहे असे सांगत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. सोसायटीच्या संचालकांचे अभिनंदन आणि आभार मानले. महिला गटातील उमेदवार माजी उपमहापौर सौ. रेणू सुहास किल्लेकर यांनी मतदारांना एकूण 14 मते द्यावयाची असून सामान्य नऊ, महिला गटासाठी दोन, मागास ब गटासाठी एक, एससीसाठी एक, एसटीसाठी एक, अशा एकूण 14 चित्रांवर शिक्का मारून सर्व सत्ताधारी पॅनेलच्या उमेदवारांना विजयी करा अशी विनंती केली. यानंतर सुळगा हिंडलगा येथे मतदारांच्या गाठीभेटी घेऊन सत्ताधारी पॅनेलला विजयी करण्याची विनंती केली.
Belgaum Varta Belgaum Varta