बेळगाव : जीवन विवेक प्रतिष्ठान व गांधी विचारप्रेमी यांच्या वतीने महात्मा गांधी यांच्या बेळगाव आगमनाला 100 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल दिनांक 20 डिसेंबर रोजी आनंद सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी बेळगाव मधील धर्मवीर संभाजी महाराज चौक या ठिकाणी संगीत व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. म. गांधी हे १९२४ सारी राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनासाठी बेळगाव येथे दिनांक 20 डिसेंबर रोजी उपस्थित होते ते या अधिवेशनाचे अध्यक्षही होते. या ऐतिहासिक घटनेला यावर्षी शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जीवन विवेक प्रतिष्ठानच्या नीला आपटे यांनी केले. यानंतर सर्वधर्म प्रार्थना व गांधीजींच्या वैष्णव जनते या प्रार्थनेचे गायन मराठी विद्यानिकेतनच्या शिक्षिका सीमा कंग्राळकर, शाहीन शेख रेणु सुळकर, भारती शिराळे, रूपाली हळदणकर यांनी केले. यानंतर श्री. इंद्रजीत मोरे, श्री. गिरीश कामत, श्री. सुभाष ओऊळकर, श्री. विजय दिवाण, श्री. शिवाजी दादा कागणीकर यांनी महात्मा गांधी यांच्या विषयी आपले विचार व्यक्त केले. यावेळी वर्षभर विद्यार्थी व शिक्षकांच्या साठी गांधी विचारांची रुजवत व्हावी यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे ठरले. यावेळी नारायण उडकेकर, शीतल बडमंजी, गौरी ओऊळकर, अमिता नायगावकर, मंजुषा पाटील, शिल्पा गर्डे, नम्रता पाटील, समीना सावंत, जयश्री पाटील, सुनीता पाटील, अरूण बाळेकुंद्री, राहूल पाटील, शांताराम पाटील, यल्लाप्पा तरळे उपस्थित होते. आभार प्रसाद सावंत यांनी मांडले.