
बेळगाव : तालुक्यातील कंग्राळी बुद्रुक गावची ग्रामदैवत श्री महालक्ष्मीदेवीच्या वाढदिवसानिमित्त भव्य डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रुप डान्ससाठी १२००० रु. पहिले बक्षीस तर ७००० रु. हजार व सोलो वरिष्ठ (मोठा) गटासाठी ११००० रु. पहिल्या क्रमांकाचे बक्षीस तर ५००० रु. दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस तर सोलो कनिष्ठ (लहान) गटासाठी ६००० रु. रुपये प्रथम क्रमांकाचे बक्षीस तर ४००० रु. द्वितीय क्रमांकाचे बक्षीस ठेवण्यात आले असून एकूण ४५,००० रुपयांची रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत.
याकरिता प्रवेश फी ५०० रु. रुपये ठेवण्यात आली आहे.
ही स्पर्धा २८ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ठीक ८ वाजता कंग्राळी बुद्रुक येथील चव्हाटा सर्कल येथे घेण्यात येणार आहे.याची सर्व स्पर्धकांनी नोंद घ्यावी.

Belgaum Varta Belgaum Varta