
बेळगाव : येथील पायोनियर अर्बन बँकेच्या चेअरमनपदी श्री. प्रदीप मारुती अष्टेकर यांची फेरनिवड करण्यात आली असून व्हॉईस चेअरमनपदी सौ. सुवर्णा राजाराम शहापूरकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
नुकत्याच झालेल्या बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत श्री. प्रदीप अष्टेकर यांचे पॅनल बहुमताने निवडून आले होते त्यानंतर शुक्रवारी चेअरमन व व्हा. चेअरमन यांची निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी भरतेश शेबन्नावर यांनी काम पाहिले.
श्री. अष्टेकर हे चौथ्यांदा पायोनियर बँकेच्या चेअरमन पदाची धुरा संभाळीत असून शहापूरकर तिसऱ्यांदा संचालक म्हणून निवडून आल्या आहेत. यावेळी बँकेचे सर्व संचालक आणि सीईओ अनिता मूल्य व कर्मचारी वर्ग उपस्थित होता. बँकेचे संचालक, कर्मचारी व अनेक हितचिंतकानी आज बँकेत येवुन या दोघांचा सत्कार केला. याप्रसंगी निवडणूक अधिकाऱ्यांनाही सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करणारे करणारी रणजीत चव्हाण पाटील, अनंत लाड आदींची भाषणे झाली.
Belgaum Varta Belgaum Varta