बेळगाव : दि. १५/०२/२०२२ रोजी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमा अंतर्गत पिरनवाडी येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेमध्ये महाराष्ट्र एकीकरण युवा समितीकडून शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
प्रतिवर्षी मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने पहिल्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच इतर गरजू विद्यार्थाना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येते त्या अंतर्गत आज पिरनवाडी येथील मराठी प्राथमिक शाळेमध्ये साहित्याचे वाटप करण्यात आले.
युवा समिती पदाधिकारी नारायण मुचंडीकर यांनी युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमाची माहिती दिली तसेच मागच्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी नवीन विद्यार्थ्यांच्या पटसंख्येमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे त्यासाठी शाळेतील शिक्षक वर्गाचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला.
यावेळी मुख्याध्यापकांनी युवा समितीच्या उपक्रमाचे कौतुक केले.
सदर उपक्रमाला शाळेतील मुख्याध्यापक एल. बी. तलवार सर, शिक्षक एम. जी. हत्तार, नारायण पाटील आणि जोतिबा येळ्ळूरकर, कृष्णा मुचंडीकर आणि विद्यार्थी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta