
बेळगाव : बाळंतीणी आणि नवजात शिशुंच्या वाढत्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या सत्यशोधक समितीने पत्रकार परिषद घेतली. शिरहट्टीचे आमदार चंद्रू लमाणी यांनी राज्य सरकारच्या निष्काळजीपणावर टीका केली.
भारतीय जनता पक्षाच्या सत्यशोधक समितीने बाळंतीणी व शिशुंच्या मृत्यू प्रकरणाणांवर प्रकाश टाकत राज्य सरकारच्या आरोग्य व्यवस्थेतील निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शिरहट्टीचे आमदार चंदू लमाणी यांनी या पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले की, राज्य सरकारच्या अपयशी धोरणांमुळे महिला आणि बालकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या गंभीर परिस्थितीकडे दुर्लक्ष होऊ नये.
या पत्रकार परिषदेस राज्य महिला मोर्चाच्या प्रधान कार्यदर्शिका डॉ. शोभा निसीमगौडर, राज्य उपाध्यक्षा डॉ. विजयलक्ष्मी तुंगाळ, कर्नाटक राज्य भाजप महिला सचिव डॉ. सोनाली सरनबोत, सोशल मीडिया राज्य समन्वयक प्रदीप कडाडी, राज्य सोशल मीडिया कमिटी सदस्य नितीन चौगले, जिल्हा मीडिया प्रमुख सचिन कडी, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा शिल्पा केकरे, सोशल मीडिया जिल्हा समन्वयक सुभाष सन्नवीरप्पनवार, मनोज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta