बेळगाव : दरवर्षीप्रमाणे कर्नाटक राज्य रयत संघटना-हरित सेनेतर्फे 21 जूलै रोजी आचरणात आणला जाणारा शेतकरी हुतात्मा दिन यावर्षी बेळगाव जिल्ह्यातील रयत संघटना-हरित सेनेतर्फे यरगट्टी येथे गांभीर्याने पाळल्या जाणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासंबंधीची बैठक अलिकडेच गोकाक येथे जिल्हा रयत संघटनेचे तसेच प्रत्येक तालूका पदाधिकारी यांची येथील विश्रामगृहात बैठक व चर्चा होण्याआधी कोरोना काळात जे शेतकरी नेते व शेतकरी यांचे निधन झाले त्यांना श्रद्धांजली वाहून पुढील चर्चेला सुरुवात झाली. त्यात यरगट्टीमध्ये सदर हुतात्मा दिन कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या प्रमाणात करण्याचे ठरवून सबंध राज्य तसेच महाराष्ट्रातील शेतकरी नेत्यानांही आमंत्रण देण्याबद्दल चर्चा करण्यासाठी राज्याध्यक्ष कोडिहळ्ळी चंद्रशेखर यांच्याशी चर्चा करुन ठरवले जाईल असे ठरले. या सर्व कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या प्रमाणात झालेतरी कोरोनाचे सर्व नियम पाळले जावेत असे ठरले.
या बैठकीत राज्य संचालक गणेश इळिगेर, भिमशी गडादी, जिल्हाध्यक्ष सत्याप्पा मल्लापूर, सचिव रमेश मडिवाळ तसेच प्रत्येक तालुकाध्यक्षांनी आपले विचार मांडले. याठिकाणी बेळगाव, अथणी, रायबाग, कुडची, रामदुर्ग, कित्तूर, यरगट्टी, गोकाक, आरभावीसह बेळगाव जिल्ह्यातील अनेक तालूक्यातील शेतकरी प्रतिनिधी हजर होते.