बेळगाव : येळ्ळूर रोड मार्गे रोज खानापूर तालूक्यातून वाळू, विटाच्या गाड्या भरधाव येत- जात असतात. शेतात जाणारे शेतकरी, महिला या गाड्यांचा वेग पाहून आधीच घाबरत बाजूला होतात. त्यात आज सकाळी 9.30 च्या सुमारास येळ्ळूरकडून वडगावकडे जाणारी भरलेली भरधाव ट्रक तसेच वडगावकडून येळ्ळूरमार्गे खाली होऊन जाणारा भरधाव टेंम्पो यांची येळ्ळूर सिमेजवळ दोन्ही गाड्यांची जोरात धडक झाली आणि मोठा आवाज होत टेंम्पो चालकाचा ताबा सुटून बाजूच्या भातपीकांच्या शेतात टेंम्पो उलटून पडला. त्यात सुदैवाने ड्रायवरला कांही झाले नाही किंवा योगायोगाने ज्या शेतात टेंम्पो उलटला तिथे शेतकरी नसल्याने जिवितहानी झाली नाही. अपघाताच्या आवाजाने आजूबाजूचे शेतात गेलेले शेतकरी तसेच कामावर जाणारे नागरिकही अपघातस्थळी जमा झाले. येळ्ळूरचे अनेक शेतकरी आपला रोष प्रकट करत रोजच या भरधाव गाड्यांमुळे आमचा जिव मुठित धरुन यावे लागत. आता शेतीत भांगलनीचा व भात लावणीचा जोर असल्याने मोठ्या संख्येने महिला येत असतात. तेंव्हा या रोडवरुन या वाळू-विटाच्या ट्रक व टेंम्पोवर बंदी आणून त्यांना खानापूर रोडवरुन जाण्यासाठी येळ्ळूर ग्रामपंचायतीने संबंधीत खात्याला निवेदन देत आंदोलनाचा इशारा द्यावा, असे तिथे जमलेले शेतकरी, महिला व नागरिक म्हणत होते.
Check Also
पंचमसाली आरक्षणासाठी १८ रोजी ‘चलो बेंगळुरू’ची हाक : बसवजय मृत्युंजय स्वामी
Spread the love बेळगाव : गेल्या वर्षभरापासून पंचमसाली समाजाचे २ए आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन सुरु …