खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील अतिदुर्गम अशा जंगल भागातील तळावडे येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळेची विद्यार्थीनी कुमारी अंकिता सलाम हिने केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल विद्यार्थी योजनेंतर्गत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले. यशामुळे तिला इयत्ता नववी ते बारावी पर्यंतच्या शिक्षणासाठी ४८ हजार रूपयाची शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे शिक्षण घेणे शक्य होत नाही त्यामुळे अर्धवट शिक्षण सोडावे लागते. परंतु केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे शिष्यवृत्ती देण्यासाठी देशभर परीक्षा घेण्यात आल्या. त्या परीक्षेत तळावडे (ता. खानापूर) मराठी शाळेची विद्यार्थीनी अंकिता सलाम हिने यश संपादन केले. त्यामुळे तिचा शाळेच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षिका सुमित्रा शिराळकर, ए. के. निर्मळे, एन. आय. मुचंडी, आर. के. पाटील, पी. के. कुरबर उपस्थित होते.
प्रतिक्रिया
केंद्राची शिष्यवृत्ती मिळाल्यामुळे पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत झाली. प्रत्येक विद्यार्थ्यांने या परीक्षेसाठी अभ्यास करून भाग घ्यावा व यश संपादन करावे. शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास केला. त्यामुळे यश मिळाले.
– अंकिता सलाम, विद्यार्थीनी
Check Also
खानापूर नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष निवडणूक २७ रोजी; दोन्ही पदे सामान्य महिलांसाठी राखीव
Spread the love खानापूर : खानापूर नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचा मार्ग अखेर मोकळा …