Wednesday , December 10 2025
Breaking News

रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्या वतीने RYLA चे आयोजन

Spread the love

 

रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्या वतीने सेंट जर्मेन इंडियन स्कूल, भडकल गल्ली, बेळगाव येथे २ दिवसांचे RYLA चे आयोजन करण्यात आले होते.
RYLA ( ROTARY YOUTH LEADERSHIP AWARDS) हा तरुणांच्यात नेतृत्व कौशल्य विकसित करण्यासाठी रोटरी क्लबद्वारे आयोजित केलेला एक कार्यक्रम आहे.
ZRR Rtr. हर्ष शिंदे हे प्रमुख पाहुणे तर अतिथी श्री.उदय इडगल उपस्थित होते. आरसीबी दर्पणच्या अध्यक्षा Rtn. रुपाली जनाज यांनी उपस्थितांचे स्वागत केले. Rtr. हर्ष यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले की RYLA हे त्यांचे व्यक्तिमत्व सुधारण्यास कशी मदत करते आणि या दोन दिवसांत सर्वानी त्याचा फायदा करुन घ्यावा. या 2 दिवसांत 6वी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी अनेक सत्रांचे आयोजन करण्यात आले होते.
दिवस २
१) लीडरशिप मास्टरक्लास* ZRR Rtr. हर्ष शिंदे
२)खगोलशास्त्र अंतर्दृष्टी: रात्रीचे आकाश समजून घेणे : श्री. आनंद हुक्केरी
३) आंतरिक शांती: ध्यान सत्र : संजना पंडित

दिवस २:
१) तालात पाऊल : नृत्य श्रीमती अर्चना हुल्लिकट्टी यांची कार्यशाळा
२) आत्मसंरक्षणाद्वारे आत्मविश्वास : सहाना एसआर
३) द जॉय ऑफ क्रिएटिंग: आर्ट अँड क्राफ्ट वर्कशॉप : Rtn. सविता वेसणे द्वारे
“सशक्त मन, शांत हृदय”* : या थीम अंतर्गत विद्यार्थ्यांनी
संवाद साधून सत्रांमध्ये आपली प्रतिभा दाखवली.
आरसीबी दर्पण सचिव आरटीएन शीतल चिलमी, न्यू जनरेशन डायरेक्टर आरटीएन ॲड. दिव्या मुदिगौडर, Event chair Rtn. ज्योती कुलकर्णी, Rtn. सुरेखा मुम्मीगट्टी, Rtn. शीला पाटील, Rtn. सविता वेसाने, Rtn. ॲड. विजयलक्ष्मी, Rtn. पुष्पा पर्वतराव, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भारती, शिक्षक आणि 6 वी आणि 7 वी. विद्यार्थी उपस्थित होते.
MOC Rtn. विजयालक्ष्मी मन्निकेरी यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

देशाला देशभक्त, शिस्तबद्ध व कर्तव्यनिष्ठ तरुणांचीच गरज : नायब सुभेदार सुभाष भट्ट

Spread the love  शिवानंद महाविद्यालयातील ३० हून अधिक एनसीसी विद्यार्थी सैन्यात भरतीनिमित्त सत्कार कागवाड : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *