बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था मुंबई व गुरूवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा केला जात आहे.
आज खास बालवाडी विभागाच्या पालकांसाठी, “एक दिवस वाचनासाठी” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात बालवाडी विभागाच्या १५ पालकांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाचे स्वागत सीमा कंग्राळकर, प्रास्ताविक बी. बी. शिंदे सर, सूत्रसंचालन रेणु सुळकर यांनी केले. पालकांची ओळख अश्विनी हलगेकर यांनी केले. प्राची खानगावकर, सावी पाटील, विदिशा किरमटे, पार्थ कांगले, दूर्वा पाटील, काव्या शिंगटे, शर्वी बेळगुंदकर, शिव अनिखिंडी, सर्वज्ञा पाटील, गौरी पाटील, सिद्धी तंगणकर, तन्वी कोकितकर, हर्ष पाटील, श्रीयन बिर्जे या मुलांच्या पालकांनी आपण वाचलेल्या पुस्तकांचे परीक्षण मांडून विद्यार्थ्यांना वाचणाची आवड निर्माण करण्याचे महत्त्व सांगितले. या उपक्रमाच्या माध्यमातून मुलांना व पालकांना वाचणाची आवड निर्माण व्हावी, मराठी भाषा साहित्याची व साहित्यिकांची ओळख व्हावी हा उद्देश होता. बालवाडी विभागाचे ९० पालक उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारती शिराळे, वरदा देसाई, सुनिता पाटील, बाळकृष्ण मनवाडकर यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला प्रबोधिनीचे अध्यक्ष श्री. जयंत नार्वेकर, सचिव श्री. सुभाष ओऊळकर, सदस्य धीरजसिंह राजपूत, नीला आपटे, इंद्रजीत मोरे, गजानन सावंत उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta