संस्थापक श्री. एल. के. कालकुंद्री यांना राष्ट्रीय सहकार रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार संपन्न
बेळगाव : जय जनकल्याण सौहार्द सहकारी नियमित मण्णूर व जनकल्याण सामाजिक व शैक्षणिक फौंडेशन या संस्थेचा 7 वा वर्धापनदिन नुकताच पार पडला, प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन एन. एस. मुल्ला साहेब निवृत्त ARCS, व माजी महापौर मालोजी अष्टेकर यांच्या हस्ते संपन्न झाले, तसेच दीपप्रज्वलन संस्थापक एल. के. कालकुंद्री, डी. बी. पाटील, सुरेश राजूकर, मुकुंद तरळे, चेअरमन लक्ष्मण मंडोळकर, व्हा. चेअरमन संदीप कदम, शिवराज पाटील, एल. डी. चौगुले, डी. जी. पाटील, विश्वजित हसबे, संभाजी कणबरकर, ऍड. प्रिया हन्नूरकर यांच्या हस्ते संपन्न झाले. प्रास्ताविक व संस्थेच्या कार्याचा आढावा व्यवस्थापक महेश काकतकर यांनी केले. यानंतर संस्थापक श्री. एल. के. कालकुंद्री यांनी आजपर्यंत सहकारात उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल त्यांना राष्ट्रीय सहकार रत्न पुरस्कार मिळाला याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर कालकुंद्री सर यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल मालोजी अष्टेकर, एन एस मुल्ला, शिवराज पाटील, विश्वजित हसबे, डी. बी. पाटील, डी. जी. पाटील, कृष्णा चौगुले यांची गौरवपर भाषणे झाली.
सत्काराला उत्तर देताना कालकुंद्री म्हणाले की, हा सहकार रत्न पुरस्कार व सन्मान माझा एकट्याचा नसून या कामी सहकार्य केलेल्या सर्व ग्रामीण जनतेचा आहे असे स्पष्ट केले. यानंतर शालेय बौद्धिक स्पर्धेचे बक्षीस वितरण, राज्यस्तरीय क्रीडा पटूंचा सत्कार आणि महिला स्वसहाय संघातील महिलांचा सन्मान करण्यात आला. तसेच जनकल्याण सामाजिक व शैक्षणिक फौंडेशन मार्फत विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमाला संचालक जोतिबा शहापूरकर, विनायक कालकुंद्री, सागर डोणकरी,संतोष केंचनावर, भरमा आनंदाचे, कल्लाप्पा तोरे, बसवंत नाईक, ब्रिजेश देवरमनी, सुधा बाळेकुंद्री, कविता सांबरेकर, सल्लागार नारायण शहापुरकर, सिद्राय बाळेकुंद्री, परशराम कदम, जयवंत मंडोळकर, जोतिबा चौगुले, मल्लाप्पा कोतेकर, कल्लाप्पा अष्टेकर, मारुती बामणे, नारायण कालकुंद्री, टी. के. मंडोळकर, एम. बी. सांबरेकर, सी. डी. कुलकर्णी, शीतल चौगुले, लता कडोलकर तसेच संस्थेचे कर्मचारी पूनम डोंगरे, प्रतीक्षा चौगुले, सुनील सांबरेकर, मेघा बांदेकर, पिग्मी कलेक्टर यलाप्पा पाटील, प्रभाकर देसुरकर तसेच नागरिक उपस्थित होते. प्रकाश बेळगुंदकर यांनी सूत्रसंचालन केले व महेश काकतकर यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta