बेळगाव (प्रतिनिधी) : श्री सुवर्णलक्ष्मी को ऑप क्रेडिट सोसायटी आणि दैवज्ञ ब्राह्मण शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नामदार नानाशंकर शेठ यांची १५६ वी पुण्यतिथी सोसायटीच्या सभागृहात पार पडली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दैवज्ञ ब्राम्हण संघ अध्यक्ष राजू बेकवाडकर उपस्थित होते. व्यासपीठावर श्री सुवर्णलक्ष्मीचे संस्थापक मोहन कारेकर, अध्यक्ष विठ्ठल शिरोडकर, उपाध्यक्ष विजय सांबरेकर, दैवज्ञ ब्राम्हण समाज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विनायक कारेकर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
यावेळी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विनायक कारेकर यांनी उपस्थितांचे स्वागत करुन आपले विचार मांडले. तसेच सुवर्णलक्ष्मी सोसायटील अध्यक्ष विठ्ठल शिरोडकर यांनी आपल्या भाषणात नानाशंकर शेठ यांनी स्त्री शिक्षणासाठी प्राधान्य देत मुलींच्या शाळा स्वत:च्या वाड्यात चालू केल्या. उच्च शिक्षणासाठी कॉलेज व आरोग्य सेवेसाठी हॉस्पिटल, प्रवासासाठी भारतीय रेल्वेची सुरुवातही त्यांनी केली. तसेच सतीप्रथा बंद करण्यासाठी नानाशंकर शेठ यांनी प्रयत्न केले होते, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाला संचालक प्रकाश वेर्णेकर, दिपक शिरोडकर, समर्थ कारेकर, विराज सांबरेकर, माणिक सांबरेकर, राजू बांदिवडेकर, मधुरा शिरोडकर व इतर समाज बांधव तसेच सुवर्णलक्ष्मी सोसायटीचे कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचाल अभय हळदणकर तर आभार प्रदर्शन प्रदीप किल्लेकर यांनी केले.
Check Also
इस्कॉनतर्फे राधाष्टमी 11 सप्टेंबरला साजरी होणार
Spread the love बेळगाव : येथील आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन)च्या वतीने यंदा राधाष्टमी बुधवार …