Sunday , September 20 2026
Breaking News

जिव्हाळा फौंडेशनच्यावतीने डेंग्यू चिकणगुणिया प्रतिबंधक लसीकरण

Spread the love

बेळगाव (वार्ता) : पाईपलाईन रोड विजयनगर येथील मारुती मंदिरात जिव्हाळा फौंडेशनच्यावतीने डेंग्यू आणि चिकणगुणिया प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले.
सुरूवातीला मारुती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष डी. बी. पाटील आणि इतर ट्रस्टीनी जिव्हाळा फौंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुरेखा पोटे आणि इतर सदस्यांचे पुष्पहार आणि श्रीफळ देऊन स्वागत केले.
डॉ. सुरेखा पोटे यांनी लसीकरण मोहिमेचा उद्देश सांगितला आणि शहराच्या विविध भागामध्ये ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.
विजयनगर परिसरातील शेकडो नागरिकांनी या लसीकरणाचा लाभ घेतला.

यावेळी वसंत कांबळे, सुरेश पाटील, एस. पी. किल्लेकर, डॉ. मरिअम टेभला, सेक्रेटरी आरती निपाणीकर, श्रीनिवास गुडमट्टी, शेखर पाटील, कौस्तुभ पोटे, अमित पाटील, मनाली पोटे उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *