बेळगाव : रविवार दिनांक 20/02/2022 रोजी श्रीक्षेत्र शिवतीर्थ राकस्कोप या ठिकाणी मराठा एकता एक संघटन बेळगाव या सामाजिक संघटनेचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन भगवा ध्वज राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज व श्री गणेश पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाथाजी मरगाळे सर यांनी केले. या शुभप्रसंगी आपल्या बेळगाव जिल्ह्यातील धार्मिक संस्कारित पारंपरिक विकासिक दृष्ट्या समाज संघटित करत हरएक संघटनांचे जनक सखोल अभ्यासू प्रेरणादायी मार्गदर्शक सन्माननीय श्री. विलास पवार सर यांनी संबोधिले की मराठा एकता एक संघटन बेळगाव ही संघटना एकमेव पहिली मराठा समाजातून सामाजिक कूवतीने संघटितरीत्या संविधानात्मक लोकतंत्रिक नागरिकत्वाचे अधिकाराने सुसज्ज होऊन समाजाच्या हरएक क्षेत्रातील हरएक विकासासाठी कार्य करणारी सामाजिक संघटना आहे, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर मराठा एकता एक संघटन बेळगाव या संघटनेने पुढील वाटचाल कशी करावी तसेच बेळगाव जिल्ह्यातील हरएक हक्कापासून वंचित पीडित समस्त खेड्यातील शहरातील नागरिकापर्यंत संघटनेचे उद्देशपूर्व कार्य कसे पोहोचवावे हे देखील सांगितले. कारण समाज संघटित होणे ही आज काळाची गरज आहे. असे सांगत त्यांनी बहुमूल्य असे प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यानंतर मराठा एकता एक संघटन बेळगाव सन्माननीय अध्यक्ष नारायण झंगरुचे साहेब यांनी संघटनेचे हरएक खेड्यातील सर्व कार्यकारी सदस्य कार्यकारी अध्यक्ष सेक्रेटरी जनरल सेक्रेटरी या सर्वानुमते आज लोकार्पण सोहळ्यामध्ये उपस्थित सर्वांच्या साक्षीने श्रीक्षेत्र शिवतीर्थ राकस्कोप या पवित्र स्थळी बहुजन मराठा समाजाशी कटिबद्ध होऊन आपले संघटन कोणत्याही आमिषाला बळी न जाता समाज्याप्रती निर्विवादपणे समर्पित भावनेने आपल्या स्वतंत्र देशातील लोकशाहीमध्ये अनधिकृत चाललेली सावकारशाही दडपशाही यापासून आपल्या बहुजन मराठा समाजाचे संगोपन करत हरएक हक्क विकासासाठी सामाजिक अस्तित्व अस्मिता परंपरा संस्कृती स्थानिक हक्क याबद्दल जनजागृती करत कार्यरत राहील. अशी वचनबद्ध ग्वाही दिली. याप्रसंगी संघटनेचे जनरल सेक्रेटरी अमोल जाधव, संजय पाटील, नाथाजी मरगाळे सर, के. डी. पाटील सर, गजानन पाटील, पवन देसाई, महिला प्रभारी लक्ष्मी सांबरेकर मॅडम, मोनाप्पा शहापूरकर, संभाजी जाधव, यल्लाप्पा झंगरुचे, मोनाप्पा भास्कळ, राहुल शहापूरकर, निलेश पाटील, दीपक नाईक, असे शेकडो कार्यकारी सदस्य समस्त पदाधिकारी या सर्वांच्या उपस्थित मोठ्या उत्साहाने कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर खाचू सुखये साहेब यांनी कार्यक्रमाची सांगता केली.