बेळगाव : मंगळवारी भल्या पहाटेपासून बेळगावमधील काही उद्योजक आणि व्यावसायिकांच्या घरांवर आणि कार्यालयांवर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. एकाच वेळी करण्यात आलेल्या या कारवाईमुळे उद्योजक वर्तुळाची झोप उडाली आहे. बेहिशोबी मालमत्ता जमा केलेल्या काही मंडळींना याचा दणका बसला असल्याचे बोलले जात आहे.
यामध्ये गणेशपूर येथील अशोक आयर्नचे मालक अशोक हुंबरवाडी, विनोद दोड्डण्णावर, पुष्पदंत दोड्डण्णावर, कॅम्प परिसरातील व्यापारी अजित पटेल यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर छापे टाकून बेहिशेबी मालमत्ता आणि कागदपत्रांची तपासणी सुरू आहे.
बेळगाव कॅम्प आणि टिळकवाडी पोलीस स्थानकाच्या हद्दीत पहाटे सुमारास ही कारवाई करण्यात आली. बेळगावसह बेंगळुरू, गोवा आणि धारवाड येथेही आयकर विभागाच्या पथकाने दिग्गज उद्योजकांच्या घर आणि कार्यालयावर छापे घातले आहेत.