बेळगाव : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याला गेलेले बेळगावचे पाच भाविक बेपत्ता झाल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.
बेळगावातील 30 जण कुंभमेळ्यासाठी गेले होते, त्यापैकी पाच जण बेपत्ता झाल्याची माहिती आहे. आज मौनी अमावस्येनिमित्त कुंभमेळ्यात 10 कोटींहून अधिक भाविक शाही स्नानासाठी येणार आहेत. बेळगावातून 30 जण निघाले, त्यातील पाच जण ट्रॅव्हल एजन्सीतून गेले, त्यातील पाच जण बेपत्ता झाले. चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर पाच जण बेपत्ता आहेत. जास्त गर्दीमुळे संपर्क साधणे कठीण झाले आहे. मात्र या पाच जणांचा शोध घेण्यासाठी आम्ही प्रयागराज जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहोत, असे ते म्हणाले.
कुटुंबातील कोणीही अद्याप तक्रार केलेली नाही. मात्र ट्रॅव्हल एजन्सीतून गेलेले पाच जण बेपत्ता असल्याची माहिती मिळाली आहे. बेपत्ता व्यक्तींचे कुटुंबीय जिल्हाधिकारी कार्यालयात भेट देऊ शकतात. वाहनांची अडचण असल्यास योग्य ती व्यवस्था करू. ते म्हणाले की, येत्या काही दिवसांत प्रयागराजला जाणाऱ्यांना ते मार्गदर्शक सूचना देतील.