बेळगाव: प्रयागराज महाकुंभमेळ्यात वडगाव येथील मेघा हत्तरवाठ आणि ज्योती हत्तरवाठ या मायलेकीचा मृत्यू झाला. या घटनेचा धसकाच्या चक्क घरातील श्वानाने घेतला असून त्याने खाणेपिणे सोडले आहे.
घरातील मंडळी प्रयागराजला गेल्यापासून सनी नावाचा श्वान अस्वस्थ झाला. गेलेल्या दिवसापासून त्याने खाणेपिणे सोडले. एकूण श्वानाच्या वागण्यातून या दुर्घटनेचा अंदाज वर्तवला असल्याची व्यथा मृत मेघाची बहीण मानसी हिने व्यक्त केली. आम्ही श्वानाच्या वागण्याकडे दुर्लक्ष केल्याची खंत मेघाचे वडील दीपक यांनी व्यक्त केली. मेघा हट्ट धरून प्रयागराजला गेली. आईला तिच्यासोबत पाठवलं आणि दोघांनाही गमावलं म्हणून तिच्या आजीला अश्रू अनावर झाले आहेत.