Tuesday , December 16 2025
Breaking News

मराठा मंडळ इंजिनीअरिंग कॉलेजतर्फे ७ फेब्रुवारीला ‘उद्योग परिषदेचे’ आयोजन

Spread the love

 

बेळगाव : मराठा मंडळ अभियांत्रिकी महाविद्यालय, बेळगाव येथे ७ फेब्रुवारी २०२५ रोजी अकादमिया-इंडस्ट्री कॉन्क्लेव्ह म्हणजेच ‘उद्योग परिषदेचे’ आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी डॉ. एकरूप कौर (आयएएस), आयटीबीटी आणि विज्ञान व तंत्रज्ञान सचिव, कर्नाटक सरकार असतील. तर एल.एस. उमेश, एसीई डिझायनर्स, बंगळूर हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. नागराजू यादव (ट्रस्ट बोर्ड सदस्य आणि एमएलसी, बेंगळुरू) आणि मुरलीधर राव (संयुक्त संचालक, एसीई डिझायनर्स) यांचा या कार्यक्रमात सत्कार करण्यात येणार असून श्रीधर उप्पीन (बीडीएसएसआयए अध्यक्ष), प्रभाकर नागरमुणोली (वरिष्ठ उपाध्यक्ष, बीसीसीआय) आणि आनंद देसाई (यंग एंटरप्रेन्योर प्रतिनिधी) यांच्या नेतृत्वाखाली उद्योग परिषदेमध्ये संवाद सत्राचे आयोजन केले जाणार आहे.

डॉ. राजश्री नागराजू (मराठा मंडळ अध्यक्ष) यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडेल. या उद्योग परिषदेमध्ये उद्योग, सरकार, एनजीओ आणि शैक्षणिक क्षेत्रातील १२०हून अधिक प्रतिनिधी सहभागी होतील.

मराठा मंडळ अभियांत्रिकी महाविद्यालयाने “इंडस्ट्री इन कॅम्पस” या संकल्पनेला सुरुवात करण्यासाठी पाऊल टाकले आहे. महाविद्यालयाकडे सुमारे २२ एकर जमीन आहे, त्यातील ४ एकर जमीन उद्योगपती आणि स्टार्टअप उद्योजकांच्या गरजेनुसार औद्योगिक शेड्स तयार करण्यासाठी राखीव ठेवली आहे.

ही सुविधा सूक्ष्म आणि लघु उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्या उद्योजकांसाठी उपलब्ध असेल, ज्यास सरकारी स्टार्टअप प्रोत्साहन, सेंटर ऑफ एक्सलन्स आणि इन्क्युबेशन सेंटर अंतर्गत परवानगी आहे. यामुळे उद्योजकांना परिसर, इंटरनेट, ऑफिस सेटअप, नागरी सुविधा यासारख्या अडचणींशिवाय उद्योग सुरू करण्यास मदत होईल. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना या स्टार्टअप आणि सूक्ष्म उद्योगांमध्ये अभ्यासाच्या वेळेत काम करून “अभ्यास करताना कमाई” करण्याची संधी मिळेल. ही संकल्पना पाश्चात्य देशांमध्ये आधीच लोकप्रिय आहे. या कॉन्क्लेव्हमुळे संस्था आणि उद्योग या दोघांनाही अनेक संधी उपलब्ध होतील: अभियांत्रिकी महाविद्यालय कॅम्पसमध्ये लघु व्यवसाय/उत्पादन युनिट सुरू करणे, उद्योजकत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी पायाभूत सुविधा सुलभ करणे, विद्यार्थ्यांसाठी उद्योगांमध्ये इंटर्नशिपची सोय करणे, उद्योगांनी त्यांच्या क्षेत्रातील तांत्रिक व्याख्याने आयोजित करणे, शिक्षकांसाठी उद्योगांमध्ये प्रशिक्षणाची सोय करणे, शिक्षकांसोबत प्रकल्प आणि प्रोटोटाइप विकसित करणे, उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमध्ये ज्ञानाची देवाणघेवाण करणे, कौशल्य विकासासाठी “सेंटर ऑफ एक्सलन्स” सुरू करणे, एमएमईसीसोबत तांत्रिक हॅकाथॉन आयोजित करून समस्यांवर उपाय शोधणे, शिक्षकांद्वारे कर्मचाऱ्यांसाठी वर्तन/व्यवस्थापन प्रशिक्षणाची सोय करणे, ग्रामीण आणि गरजूण विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणे, गरजूना/योग्य महिला विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणे, उत्कृष्टतेला प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या कुटुंब/फर्मच्या नावाने पुरस्कार स्थापन करणे अशा अनेक संधी या उद्योग परिषदेकच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत.

भारत सरकारने अर्थसंकल्पात स्टार्टअपसाठी क्रेडिट गॅरंटी १० कोटी रुपयांवरून २० कोटी रुपयांपर्यंत वाढवली आहे. तसेच सूक्ष्म उद्योगांसाठी १० लाख क्रेडिट कार्डे प्रदान करण्यात आली आहेत, ज्यात प्रत्येकी ५ लाख रुपयांपर्यंतची मर्यादा आहे.

“इंडस्ट्री इन कॅम्पस” या संकल्पनेमुळे बेळगावमध्ये सूक्ष्म उद्योगांच्या वाढीस चालना मिळेल. जर्मनी आणि युरोपमधील अनेक तांत्रिक संस्थांमध्ये ही संकल्पना आधीच अस्तित्वात आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्येच इंटर्नशिप करून कौशल्ये प्राप्त करता येतात. सध्या पदवीधर अभियंत्यांच्या कौशल्यात आणि उद्योगाच्या अपेक्षांमध्ये अंतर आहे, या अंतराचा विचार करून ही संकल्पना राबविण्यात आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये विशेष ‘करिअर मार्गदर्शन’ सत्राचे आयोजन

Spread the love  बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूल, बेळगाव येथे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *