
खानापूर : खानापूर-बेळगाव महामार्गावरील देसूर नजीक असलेल्या हाड फॅक्टरी जवळ पोलीस खात्याच्या इनोवा कारने रस्त्यात आडव्या आलेल्या दोन म्हशींना ठोकरल्याने दोन म्हशी गंभीर जखमी झाल्या आहेत. तर इनोवा कारचा समोरील बाजूचा चक्काचूर झाला आहे.
सदर अपघात आज शुक्रवार दिनांक 14 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 5.40 वाजेच्या दरम्यान हाड फॅक्टरी नजीक घडला आहे. अपघातात जखमी झालेल्या दोन म्हैस पैकी, एका म्हैसची वाचण्याची शक्यता कमी असल्याचे समजते. अपघातात जखमी झालेल्या सदर म्हशींच्या मालकाचे नाव दुर्गाप्पा शिवाप्पा कोरवी कमल नगर देसुर असे आहे.

Belgaum Varta Belgaum Varta